Home Breaking News पुणे : यंदा आषाढी निमित्त पायी दिंडी सोहळा रद्द! बैठकीत निर्णय.*

पुणे : यंदा आषाढी निमित्त पायी दिंडी सोहळा रद्द! बैठकीत निर्णय.*

190

*🛑पुणे : यंदा आषाढी निमित्त पायी दिंडी सोहळा रद्द! बैठकीत निर्णय.*🛑
पुणे ⭕( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच यावेळी आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना यंदाच्या आषाढी वारीचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. यावेळी आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवलं जाईल. तसंच आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.

दरम्यान, मानाच्या सात पालख्या पालख्या आहेत, या पालख्यांमधील संतांच्या ज्या पादुका आहेत त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला या पादुका पंढरपूरमध्ये जातील. मात्र त्या कशा जातील हे अदयाप निश्चित झालेलं नाही, असं आळंदी देवस्थानचे प्रमुख विकास ढगे यांनी सांगितलं आहे. तसंच पादुका नेत असताना संस्थान कमिटी परंपरा व अन्य बाबी यांची सांगड घालण्याचं काम करणार आहे. तर व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची असणार आहे.

Previous articleन्या.बी.एन.देशमुख यांचे निधन
Next articleबंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.