• Home
  • न्या.बी.एन.देशमुख यांचे निधन

न्या.बी.एन.देशमुख यांचे निधन

🛑 न्या.बी.एन.देशमुख यांचे
निधन 🛑
औरंगाबाद: ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, विधान परिषदेचे माजी आमदार , विरोधी पक्षनेते,शेतकरी कामगार पक्षाचे नेते कै.बलभीमराव नरसिंहराव देशमुख, काटीकर यांचे दुःखद निधन.
मराठवाडा पोरका झाला…
उस्मानाबादचे भूमिपुत्र ( बी.एन.देशमुख)

(८५वर्षे) यांचे औरंगाबाद येथे निधन झाले . शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदारअँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, विरोधीपक्ष नेते उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. तात्यासाहेब पुरोगामी युवक संघटनेचे संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष होते, मराठवाड्याच्या जडणघडणीत पर्यायाने महाराष्ट्राच्या मोजक्या पुरोगामी नेतृत्वापैकी एक, शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेतृत्व होते. शेतमालाला हमी भाव, कामगारांच्या कष्टाला दाम व गोरगरिबांना न्यायदान तसेच मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे
.1971 साली शेतकरी कामगार पक्षाने मा.आमदार (माझे सासरे) चंद्रकांत नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली वैराग जि.सोलापूर येथे मोठा मोर्चा काढला होता या मोर्चावर पोलीसांनी बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात आठ लोक ठार झाले. या गोळीबाराची न्यायालयीन चौकशी जाहीर केली.या चौकशीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माझ्या सासरेंच्या बरोबर तीन महिने राहून बॅरीष्टर देशमुख यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले
न्यायाधीश बी.एन.देशमुख यांचे अमर शेख हे आवडते शाहीर होते.शाहीर अमर शेख यांचा विषय निघाला की तात्यासाहेब त्यांचे आठवणीतले अनेक पोवाडे चक्क सुरात गाऊन दाखवत.संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील त्यांचे कार्य खुप मोठे होते.
या उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना राज्य विधान परिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी ,कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.
सर्वसामान्यांचे प्रश्नावर लढणार्या व महाराष्ट्राचे भूषण असलेल्या बँ.तात्यासाहेबांना अखेचा सलाम’!

anews Banner

Leave A Comment