• Home
  • *पालिकेने केले खासगी रूग्णालयातील ८०% बेड्स आरक्षित.*

*पालिकेने केले खासगी रूग्णालयातील ८०% बेड्स आरक्षित.*

*पालिकेने केले खासगी रूग्णालयातील ८०% बेड्स आरक्षित.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बऱ्याच रूग्णालयात कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत असुन काही ठिकाणी बेड्सची उपलब्धता होत नाही . त्यामुळे पेठ वडगांव शहरातील सर्वच रूग्णालयात ८०% बेड्स कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश शहरातील सर्व रूग्णालयांना पालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) यांनी दिले आहे.
तसेच शहरातील चैतन्य हाँस्पिटल,
महापुरे हाँस्पिटल , गिरीजा हाँस्पिटल , शंकरदास हाँस्पिटल ,
समर्थ हाँस्पिटल ,आशिर्वाद हाँस्पिटल , हिराई हाँस्पिटल,
कुडाळकर हाँस्पिटल , कवठेकर हाँस्पिटल , धन्वंतरी आयुर्वेदीक मेडीकल काँलेज याठिकाणी २२६ बेड्स कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी देणार असुन यापैकी तिन रूग्णालयात ह्वेंटिलेटरची सोय उपलब्ध असणार आहे. तसेच शहरातील गिरीजा आणि कुडाळकर हाँस्पिटलला महात्मा फुले जिवनदायी योजना लागूआहेत.
पालिकेचे अभियंता अमिन तांबोळी यांची हाँस्पिटलच्या समन्वयक पदी नेमणूक करण्यात आली , असुन सर्व हाँस्पिटलच्या कोरोना रूग्णांच्या बिलाची तपासणी पालिकेच्या शासकिय आँडिटस् मार्फत होणार आहे.अशी माहीती वडगांव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे) यांनी दिली आहे.

anews Banner

Leave A Comment