Home भंडारा लेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार 11 डिसेंबर ला मिटेवानी येथे...

लेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार 11 डिसेंबर ला मिटेवानी येथे ( मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत )

181

आशाताई बच्छाव

IMG_20231210_073736.jpg

लेफ्टनंट चषक अकरसिंग पटले यांचा नागरी सत्कार 11 डिसेंबर ला मिटेवानी येथे
( मिटेवानीचा चषक युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत )

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )तुमसर जवळील मिटेवानी या ग्रामीण भागातील युवक ” चषक अकरसिंग पटले ” हा भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट झाला. उडीसा राज्यातील गोपालपूर येथे त्याला नियुक्ती देण्यात आली.त्याचे मिटेवानी येथे दि .11 डिसेंबर 2023 ला त्याच्या जन्मगावी आगमन होतो आहे.लेफ्टनंट चषक ला मिटेवाणी गाव मानाचा मुजरा करणार आहे.त्याच्या आगमना निमित्त ” स्वागत समारोह “कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय मिटेवानी,तंटामुक्ती समिती,महिला पुरुष बचत गट,मराठा सेवा संघ,आलोक आणि समस्त ग्रामवासी मिटेवानी यांनी केले आहे.या स्वागत समारोह कार्यक्रमाला अतिथी म्हणून लोहीत मतानी I.P.S.पोलीस अधिक्षक,भंडारा, रश्मिता राव I.P.S.पोलीस उपविभागीय अधिकारी,तुमसर,दर्शन निकाळजे उपविभागीय अधिकारी तुमसर,सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी न प.तुमसर,निलेश ब्राम्हणे पोलीस निरीक्षक तुमसर उपस्थित राहणार आहेत.11डिसेंबर 2023 सायंकाळी 5 वाजता आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे.