Home भंडारा तिलक वैद्य यांची सचिव पदी निवड

तिलक वैद्य यांची सचिव पदी निवड

210

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-072233_WhatsApp.jpg

तिलक वैद्य यांची सचिव पदी निवड

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी तिलक रामदास जी वैद्य यांची निवड करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारणीमध्ये तिलक रामदास जी वैद्य यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून आपण भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे, विचार तथा पक्षाचे काम तळागाळा- तील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम असेल. नियुक्तीचे श्रेय भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र चे खासदार सुनील मेंढे , माजी आम. डॉ. परिणयजी फुके,भाजप विदर्भ संगठन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, वीरेंद्रजी अंजनकर,भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, भाजयुमो प्रदेश महामंत्री बादल कुलकर्णी,शिवानीताई दाणी,भाजप जिल्हा मुख्यालय प्रभारी डॉ. हेमंतजी देशमुख यांनी अभिनंदन केले व पुढील उज्वल भवितव्य करिता हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleमेशीच्या गणेशनगर परिसरात बिबटयांचे दर्शन;नागरीकात घबराटीचे वातावरण
Next articleस्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी –
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.