
आशाताई बच्छाव
गो.सी. टोम्पे महाविद्यालयामध्ये “ओझोन दिन” साजरा
मयुर खापरे
चांदूरबाजार :
स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके अध्यक्ष म्हणून लाभले . याप्रसंगी सरांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, वातावरणाला व संपूर्ण सजीव सृष्टीला वाचवायचे असेल तर वातावरणात असलेल्या ओझोन वायूच्या पट्ट्याला आपल्याला वाचवावे लागेल तरच आपण वाचू अन्यथा आपला नाश अटळ आहे कारण आपण पृथ्वीवर एवढे अतोनात निसर्गाचे नुकसान केले वृक्षतोड, वाढतीअसंख्य वाहनांची गर्दी, अनेक उद्योगधंदे यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड,
कूलोरोफ्लूरोकार्बन याचे प्रमाण वातावरणात वाढत चालले याचा दुष्परिणाम म्हणून तापमान वाढायला सुरुवात झाली. या वाढत्या तापमानाला फक्त मानव जबाबदार आहे व मानवच त्याचं निराकरण करू शकतो म्हणून सर्वांनी निसर्गाला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे तर डॉ. विजय टोम्पे यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र व भूगोल विभागातर्फे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात द्वीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण परिमल, भूगोल विभाग प्रमुख डॉ. सचिन भोंम्बे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुमित इंगळे तसेच डॉ. विजय के. टोम्पे, डॉ. प्रवीण इंगळे, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेजव उपस्थित होते . ओझोन दिवसाच्या निमित्ताने भूगर्भशास्त्र विभागाचे डॉ. सुमित इंगळे यांनी विद्यार्थ्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शशिकांत दुपारे तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन भोंम्बे, भूगोल विभाग प्रमुख यांनी केले.