Home जालना गोंदी पोलीसांकडून महामार्गावर रॉबरी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

गोंदी पोलीसांकडून महामार्गावर रॉबरी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

144

आशाताई बच्छाव

1001615025.jpg

गोंदी पोलीसांकडून महामार्गावर रॉबरी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक 19/06/2025
पोलीस ठाणे गोंदी हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरती ट्रक चालक लालसिंग अहीरवार हा कंपनिची ट्रक क्रमांक एम एच २०डी ई ४१०६ यात कंपनीचे सामान घेउन बिदर येथे घेउन जात असताना त्यात महामार्गावर महाकाळा येथे दोन अज्ञात व्यक्तींनी हात करून थांबण्याचा इशारा केला. ट्रक चालकाने ट्रक थांबविल्यानंतर त्या व्यक्तींनी त्याच्या डोळयात काहीतरी टाकून त्यास ट्रक मधून खाली ओढून त्यास मारहाण केली व ट्रक हा मालासह पळवून नेला. गोंदी पोलीसांना याची माहीती मिळताच गोंदी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाउन ट्रक चालक लालसिंग अहीरवार यास सरकारी दवाखाना येथे औषधउपचारा करीता दाखल केले व त्यानंतर ट्रकचोरून घेउन जाणारे इसम नामे बंडू ऊर्फ रामेश्वर भिमराव वाघमारे रा. महाकाळा व समाधान बबन बेद्रे रा. अंकूश नगर यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून गुन्हयातील गेला माल ट्रक व कंपनिचा माल असे एकूण ३६,३३,११५ रूचा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन गोंदी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक, श्री अजयकुमार बंसल साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, आयूष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, श्री विशाल खांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक किरण हावले, पोहेकॉ रामदास केंद्रे, पोकों शाकिरोद्दीन सिध्दीकी, चालक पोलीस कॉन्स्टेबल वैद्य सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक किरण हावले हे करीत आहेत.

Previous articleमालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर सरपंचाने शंभर पन्नास रुपयांच्या
Next articleपिंपळगाव रेणुकाई येथील वेदांत समाधान बेराड यांचे नीट परीक्षेत घवघवीत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.