आशाताई बच्छाव
शिवांनी हांडेच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना अन्नदानाचे वाटप !
मुखेड ता. प्रतिनिधी
येवती येथील श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलची विद्यार्थ्यींनी कु. शिवांनी प्रमेश्वर हांडे हिच्या सातव्या वाढदिवसा निमित्त येवती येथील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना खिचडी व जिलेबीचे वाटप करुन वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
येवती हे गाव शिवांनी हांडेचे आजोळ असुन ती सौ. सविता प्रमेश्वर हांडे यांची मुलगी तर प्रगतशील शेतकरी राम माळगे यांची ती नात आहे.
दि. १८ जुन २०२५ रोजी येवती येथील श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूल येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून व अन्नदाने शिवांनी हांडेचा सातवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी पब्लिक स्कूलचे संचालक, आनंदराव भानुदास राठोड शिवांनीची आई सविता प्रमेश्वर हांडे आजोबा राम माळगे व गावातील प्रतिष्ठित पोलिस पाटील बालाजी रामपुरे, निळकंठराव देशमुख, प्रबतराव धानुरे , उत्तमराव रामपुरे, हाणमंत माळगे, महेश पाटील, तानाजी सुडके, विलास सुडके , व्यंकट पांचाळ, नारायण पाटील कासरवाडीकर , संतोष पिंपरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. हार तुरेला फाटा देत अवाढव्य व्यर्थ खर्च न करता अत्यंत साध्या पद्धतीने केक कापून व अन्नदान करुन वाढदिवस साजरा केल्याने यांची चर्चा सर्वत्र होत आहे.






