Home परभणी वन्यप्राण्यांचा शिवारात धुडगूस; विहिरीत पडून निलगाईचा मृत्यू

वन्यप्राण्यांचा शिवारात धुडगूस; विहिरीत पडून निलगाईचा मृत्यू

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20221218-WA0050.jpg

वन्यप्राण्यांचा शिवारात धुडगूस; विहिरीत पडून निलगाईचा मृत्यू

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर:- तालुक्यातील कावी येथिल प्रविण अप्पा तरटे पोलीस पाटील यांचे सर्वे क्रमांक १८५ मध्ये शेत आहे.यंदाच्या रब्बी हंगामातील पिके बहरली असून, या पिकांत वन्यप्राणी चारापाण्याच्या शोधात भटकत आहेत. हे प्राणी रब्बी हंगामातील पिकांत धुडगूस घालून शेतकऱ्यांचे नुकसानही करीत आहेत. अशात शनिवारी१७ डिसेंबर रोजी रात्री निलगाईचा कळप चारापाण्याच्या शोधात भटकत असताना त्यातील एक निलगाय प्रविण अप्पा तरटे -पो. पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. प्रविण अप्पा तरटे हे १७ डिसेंबर रोजी शेतात गेले, असता त्यांना विहिरीत मृत अवस्थेतील निलगाय दिसली त्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक कुंभकर्ण मॅडम हे वनकामगार गंगाधर हरहरे , प्रसाद शेळके, पांडुरंग वाघ व वाहनचालक यांच्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जेसीबी च्या सहाय्याने निलगाईला बाहेर काढण्यात आले. यावेळी सोमनाथ काठमोरे ,सुदाम तरटे,राहूल तरटे, संदिप तरटे, संभाजी उगले, गजानन काकड ,मुंजा उगले आदी उपस्थित होते.
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
रब्बी हंगामातील पिक बहरत असताना वन्यप्राणी शिवारात हैदोस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. यंदा बियाणे, खतांची दरवाढ, बियाण्यांचा तुटवडा, पीक कर्जास विलंब, डिझेल दरवाढ आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना आता वन्यप्राण्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान चालविल्याने शेतकरी अधिकच त्रस्त झाले असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here