Home परभणी आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सेलू शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सेलू शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

125

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0073.jpg

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सेलू शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)सेलू:-भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्ष साजरा करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज बुधवार १० ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरात दुचाकीवरून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सेलू-जिंतुर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाषराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वात व उपस्थितीमध्ये सेलु शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.
शहरातील विद्यानगर, समता नगर, शिवाजीनगर, राजमोहल्ला नगर, मठ गल्ली चौक, क्रांती चौक, त्यानंतर देवगिरी बँकेजवळून मोंढा परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जिंतूर नाका परिसर भारतीय जनता पार्टी कार्यालय व परत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, तालुकाध्यक्ष शिवहरी शेवाळे, महामंत्री जिल्हा संघटन आकाशराव लोहट, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग शेळके, भाऊराव सोनवणे, दामोदरराव दळवे, जिल्हा चिटणीस भागवत दळवे, सेलू शहराध्यक्ष कपिल फुलारी, युवा मोर्चाचे सेलू शहराध्यक्ष बाळासाहेब काजळे, महामंत्री अभिजीत रोडगे, जिल्हा कोषाध्यक्ष महादेव गायके, अर्जुन बोरुळ, संदीप बोकन, जीवन ढवळ, कृष्णा चव्हाण, नागेश ठाकूर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा… अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर
Next articleमहंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा……….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.