आशाताई बच्छाव
भरधाव कारने दुचाकीस्वारास उडवले; दोन जण गंभीर जखमी
विष्णु डाखुरे ( तालुका प्रतिनिधी )
जिंतूर: जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील भोगाव जवळ कार व दुचाकित झालेल्या अपघात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने दोन वर्षाच्या चिमुरडीला कसलाही मार लागला नाही सदर घटना दि.6 ऑगस्ट सकाळी 11;30 च्या सुमारास घडली. नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून जिंतूर औंढा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली नेहमीच अपघात होत असतात ,रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे . अशातच भोगाव जवळ दुचाकीस्वार मनोज मोरे शहरातील रुग्णालयात उपचार करून भोगाव गावाकडे निघाले सोबत महिला व लहान मूल घेऊन दुचाकीवरून जात असताना औढ्याकडून भरधाव येणाऱ्या कार वाहन क्रमांक एम एच 17 ए .जी 5524 या वाहनाने जोरदार दुचाकीला धडक दिली, यामध्ये दुचाकीवरील मनोज मधुकर मोरे वय 30 वर्ष,भाग्यश्री मोरे वय 25 वर्षे हे दोन जण गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना ग्रामस्थ शेख मुनाफ व इतर नागरिकांनी जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉ. फराजखान वर्षा हरकळ मनीषा देशमाने, आदींनी प्राथमिक उपचार केले मनोज मोरे यांच्या पायाला,हाताला व भाग्यश्री मोरे यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे या आपघातात दोन वर्षे चिमुरडी ही हवेत उडून बोनेटवर जाऊन आदळली तरी देखील तिला काही सुदैवाने मार लागलेला नाही घटना घडतातच चार चाकी वाहन चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला असून घटनास्थळी महामार्ग पोलीस निरीक्षक केंद्र,पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुरसुडकर, होमगार्ड मधुकर राठोड आदींनी घटनास्थळी येऊन भेट देत प्राथमिक पंचनामा केला असून बातमी देईपर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.






