Home परभणी जिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या शहरातील बलसा रोडवरील चित्तथरारक घटना

जिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या शहरातील बलसा रोडवरील चित्तथरारक घटना

115

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0043.jpg

जिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

शहरातील बलसा रोडवरील चित्तथरारक घटना

विष्णु डाखुरे ( जिंतूर प्रतिनिधी )

जिंतूर : शहरातील बलसा रोडवरील पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणाचा चाकू मारून खून केल्याची चित्तथरारक घटना दि. १४ जुलै रोजी सायंकाळी ५ : ३० वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली.
सदरील घटनेविषयी विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मिर्झा अफरोज बेग, सोमेश्वर चिकटे, योगेश दहिवाल आणि यश राठोड हे चार मित्र बलसा रोडवरील एका धाब्यावर बसलेले होते. त्यांना शहरातील पाच ते सात जणांच्या गटाने फोनवर संपर्क साधून बलसा चौकात बोलावून घेतले. ते बलसा चौकात आल्यानंतर दोन्ही गटात पूर्ववैमनस्यातून शाब्दिक बाचाबाचीस सुरुवात झाली व काही क्षणातच शाब्दिक भचाबाचीने उग्ररूप धारण करून एका २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याच्या पोटात आणि त्याचे मित्र सोमेश्वर चिकटे याच्या हातावर धारदार शास्त्राने वार केले व घटनास्थळावरून पोबारा केला. धारदार शस्त्राने झालेल्या चित्तथरारक हाणामारीत २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा जागीच मृत्यू झाला तर सोमेश्वर चिकटे गंभीररित्या जखमी झाले आहे. मृत्यूदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्नालयाच्या साहित्याची तोडफोड केली. काहीक्षनातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी गोफणे, सपोनि कोकाटे, चौरे, पोमनाळकर, पोउपनि गाडेकर, जमादार जोगदंड, पो कॉ जिया खान आदींनी रुग्णालयात जमलेल्या जमावाला पांगविले.

चौकट

मारेकरुंना अटक करण्यासाठी नातेवाईकांचा ठिय्या धारदार शस्त्राने २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा निर्घृण खून करून फरार झालेल्या मारेकरुंना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेहाचा शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेऊन मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले.

Previous articleसाल्हेर किल्ल्यावरील घटनेत मृतात मालेगांवच्या तरुणाचा समावेश; एक जखमी..!
Next articleमुखेड जाणाऱ्या रस्त्यावरील काम खानापूर फाटा येथे अर्धवट झाल्याने वाहने अडकुन रहदारीस अडथळा,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.