Home परभणी बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय

बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय

313

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0006.jpg

बस अभावी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची गैरसोय

शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर तालुक्यांतील कावी, बोरगीळवाडी, दहेगाव,कुर्हाडी, पिंपळगाव,भोसी,शेवडी या भागातून विद्यार्थीनींनीसाठी असणारी मानवविकास योजनेतंर्गत बससेवा यावर्षी कधी सुरु होणार? असा प्रश्न विद्यार्थीनींमधुन उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत येण्यासाठीचा प्रवास सुरक्षीत व्हावा या दृष्टीने शासनाने ही योजना सुरु आहे. परंतू शाळा सुरु होऊन चार दिवस झाले तरी देखील सावित्रींच्या लेकींची गैरसोय मात्र प्रशासनाला दिसत नसल्याची केली खंत पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
जिंतूर ते कावी या परिसरात विद्यार्थीनींना शाळेला प्रवास करण्यासाठी बससेवा हे महत्वाचे माध्यम आहे. परंतू परिवहन महामंडळाची बससेवा ही वेळेवर नसल्याने विद्यार्थीनींना बराच वेळ ताटकळत बसावे लागत आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे खर्चीक व असुरक्षित असल्यामुळे अनेक विद्यार्थीनी बसअभावी शाळेत गैरहजर राहत आहेत. यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने मानवविकास बससेवा सुरु करावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ही नियमीतपणे सुरु ठेऊन ग्रामीण भागातील जनतेची होणारी गैरसोय कमी करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीकांतून करण्यात येत आहे

Previous articleराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी संपन्न!. 
Next articleमुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व नागरीकांच्या घरांची आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली पहाणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.