राजेंद्र पाटील राऊत
ओबींसीना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजपाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली:स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे या मागणीसाठी व ओबिसी समाजाचे आरक्षण घालवणार्या महाविकास आघाडी सरकारचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी गडचिरोली ओबिसी मोर्चाच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण स्थानीक इंदिरा गांधी चौकात येथे आयोजीत करण्यात आले आहे.
यावेळी लाक्षणीक उपोषणाला बसलेले आमदार डॉक्टर देवरावजी होळी , भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंञी प्रशांतजी वाघरे,ओबिसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनिलजी पारधी,किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जेष्ठ नेते रमेशजी भुरसे,ओबिसी आघाडीचे जिल्हा महामंञी भास्करराव बुरे,भाजपा गडचिरोली शहर शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंञी केशवजी निंबोडे,विनोद देवोजवार,भाजपा जिल्हा पदाधिकारी अनिलजी पोहनकर बंडुजी झाडे,चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलिपजी चलाख,तालुका महामंञी साईनाथजी बुरांडे,विनोदजी गौरवकर,जेष्ठ नेते जयरामजी चलाख,राजु शेरखी,यांच्या सह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते