आशाताई बच्छाव
शालेय विद्यार्थ्यांकरिता नियोजित वेळेत मानव विकास च्या एसटी बसेस सुरु करा-
अन्यथा परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रूपेश टिकले यांनी दिला तिव्र आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकारी, आगार प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:: शालेय विद्यार्थ्यांकरीता मानव विकास मिशन अंतर्गत बसेस सुरु आहेत. मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या नियोजित वेळेवर सदर बसेस सोडल्या जात नसल्याने व बसेस मध्ये विद्यार्थ्या व्यतिरिक्त इतर हि प्रवासी प्रवास करत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबतच मानव विकास मिशनच्या अनेक बसेस अधिक काळ जुन्या आहेत. अशा बसेस तातडीने बदलविण्यात याव्यात व विद्यार्थ्यांच्या नियोजित वेळेत बसेस सोडण्यात याव्यात. अश्या विविध मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस परिवहन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा अध्यक्ष परिवहन विभाग रुपेश टिकले , काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष संजय चन्ने,संजय मेश्राम, अनिल कुंठावार, हिवराज बोदलकर सह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.






