Home परभणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री चालूच कठोर...

पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री चालूच कठोर करवाई करण्यास बामनी पोलीस असमर्थ

519

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0001.jpg

पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री चालूच

कठोर करवाई करण्यास बामनी पोलीस असमर्थ

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न
गावातील युवकांनी दिला दारू विक्रेत्यांच्या घरात जाऊन दारू च्या बाटल्या फोडन्याचा इशारा आणी त्या
गावामध्ये कायदा आणी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न् उपस्थित होत आहे …

प्रतिनिधी:-शत्रुघ्न काकडे पाटील (युवा मराठा न्युज नेटवर्क)
:-जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी दी .19/4रोजि सावंगी भांबळे येथील बचत गटाच्या महिला आणी ग्रामपंचायत ने गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते परंतु गावातील दारू बंद तर झालीच नाही पण गावामध्ये अजून नवीन अवैध दारू विक्रेते तयार झाले आहेत आनि हे दारु विक्रेते आन्लेला माल् लपुन ठेवुन त्या मधिल चार ते पाच बाटल्या खिशात ठेऊन गावात फिरत आहेत आणी दारू विक्री करत आहेत गावातिल दारू विक्रेत्यावर काहीच परिणाम झालेला नाही दारुड्यामुळे गावातील सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत बामनी पोलीस या प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष्य करत असल्याच गावातील महिलांचे म्हणणे आहे जर गावातील अवैध दारू विक्री पूर्ण पणे बंद नाही झाली तर महिला बचत गटातील सदस्या मा.पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालासमोर उपोषणास बसणार आहेत असे महिलांनी सांगितले आहे .
आणी तसे दिलेल्या निवेदनात नमूद देखील केले आहे ..

*प्रतिक्रिया*:-आम्ही बचत गटातील सर्वएकदा महिला मा.पोलीस अधीक्षक साहेबाना गावातिल अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले आणी बामनी पोलिसांना देखील त्याची प्रत दिली होती बामणी पोलिसांनी आम्हाला तुमच्या गावातील दारू पूर्ण पणे बंद करू असे आश्वासन दिले होते परंतु त्यांनी या अवैध दारू विक्रेत्यावर कोणतीच कठोर करवाही केलेली नाही उलट गावामध्ये एक दारूचे दुकान वाढले आहे त्यामुळे मा .पोलीस अधीक्षक साहेबानी या कडे स्वतः जातीने लक्ष्य घालावे आणी गावातील अवैध दारू विक्री कायमची बन्द करावी नाहीतर आम्ही सर्व महिला मा.पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत…
*द्वारकाबाई जनार्धन भांबळे*
*सचिव,स्व.स.महिला बचत गट सावंगी भांबळे*

Previous articleदेवळा तालुक्यात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात साजरी
Next articleपाच दिवसांचा आठवडा; पण अधिकारी, कर्मचारी येईना वेळेवर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.