राजेंद्र पाटील राऊत
पंतप्रधान किसान सन्मान चा आठवा हफ्ता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – अजिंक्य मेडशीकर मालेगांव,( चंद्रकांत गायकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क विदर्भ)
शेतकरयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
सदर योजना केंद्र सरकारच्या विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासना कडून प्राप्त होणाऱ्या निर्देशप्रमाणे राज्यात राबविण्यास मंत्री मंडळाच्या दि 04-02-2019 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली
किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत होता. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते.
मात्र मे महिन्या मध्ये काही शेतकरी वर्गाच्या खात्यात पैसे जमा केले तर काही शेतकरी अजून ही सन्मान निधी अंतर्गत 2000 मिळण्याचे प्रतीक्षेत आहे.
आता काही दिवसा मध्ये पाऊस सुरू होऊन पेरणीस सुरुवात होईल आणि त्या आगोदर जर हे पैसे भेटले असते तर त्यांचा शेतकर्याला निश्चित त्याचा फायदा झाला असता किंवा पेरणी पूर्व मशागत करण्यासाठी ह्या पैश्यामुळे काही प्रमाणात का होइना पण आर्थिक स्वरूपाचा हातभार लागला असता.