Home विदर्भ लोकनेता संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन द्यावे – एस...

लोकनेता संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन द्यावे – एस राठोड

371

आशाताई बच्छाव

1001040827.jpg

लोकनेता संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन द्यावे – एस राठोड

हिंगोली ( संजीव भांबोरे)लोकनेता संजय भाऊ राठोड यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला . त्यांनी 143,115 मते मिळवली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ठाकरे माणिकराव गोविंदराव यांचा 28,775 मतांच्या फरकाने पराभव केला.
2008 पासून अस्तित्वात नसलेल्या दारव्हा विधानसभा मतदारसंघातून 2004 ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकून शिवसेनेच्या तिकिटावर ते प्रथमच आमदार झाले. नंतर ते 2004,2009 , 2014 , 2019 आणि 2024 मध्ये सलग पांच वेळा दिग्रस मतदारसंघातून निवडून आले.
,2019 च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी 136,824 मते मिळविली आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी, अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा 63,607 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांचा 79,864 मतांनी पराभव केला होता. त्यांनी महसूल मंत्रालयात (महाराष्ट्र) राज्यमंत्री म्हणून काम केले . 2019 मध्ये ते महाराष्ट्राचे वन विभाग , आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री होते .त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे 2014 आणि 2020 मध्ये दोन वेळा आणि 2015 मध्ये वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले
2021 मध्ये त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. 2022 मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र) मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली आणि 2023 मध्ये त्यांनी मृद व जलसंधारण मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले .
संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारणी आहेत . ते यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस – दारव्हा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत . ते विदर्भातील शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांनी UBT सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते परंतु नंतर ते 2022 मध्ये एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये सामील झाले.2024 च्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला अन महाराष्ट्रा मध्ये महायुतीला बहुमत मिळाला व मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस अन महाराष्ट्रा राज्याला दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली यामुळे एकच चर्चा रंगु लागली कि मंत्री मंडळ विस्तार कधी व आमदार संजय भाऊ राठोड यांच्या नावाची चर्चा बंजारा समाजा मध्ये सोसल मीडिया च्या माध्यमातुन पसरू लागली कि संजय भाऊ राठोड यांना मंत्री पद मिळणार नाही यामुळे संपुर्ण बंजारा समाज नाराज झालाय, संजय भाऊ राठोड हा बंजारा समाज चा एकमेव असा नेतृत्व आहे त्यावर संपूर्ण बंजारा समाजाचा विश्वास आहे,विकास पुरुष म्हणुन संजय भाऊ राठोड कडे पाहतात, तीर्थक्षेत्र पोहरादेवी चे धर्मगुरु व महंत आमदार बाबुसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत शेखर महाराज, महंत जितेंद्र महाराज,ई संतानी एकनाथ शिंदे यांना निवेदन केले कि आमदार संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे कारण संजय भाऊ राठोड हे बंजारा समाजाचे केंद्रबिंदु आहे,येणार्या मंत्री मंडळात मंत्री म्हणुन त्यांना बघायचे आहे व बंजारा समाजाचा विकास अजून काई झालेला दिसत नाही त्यांच्या नेतृत्वात विकास करायचा आहे समाजाचे अनेक प्रश्न, समस्या आहेत ते संजय भाऊ राठोड च्या माध्यमातुन काम होतील संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्यास बंजारा समाज महायुती वर नाराज होईल असे संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अशासकीय सदस्य व द न्यू विजन तांडा फाउंडेशन व गोर सैनिक चे प्रमुख एस राठोड यांनी सांगितले.

Previous articleपरमार्थातून कौटुंबिक सौख्याची प्राप्ती योगेश्वरी महाराज : श्रीरामवाडी कीर्तन महोत्सवाचे सहावे पुष्प
Next articleसर्व संविधान प्रेमींच्या वतीने आज देगलूर बंद ची हाक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.