Home उतर महाराष्ट्र परमार्थातून कौटुंबिक सौख्याची प्राप्ती योगेश्वरी महाराज : श्रीरामवाडी कीर्तन महोत्सवाचे सहावे पुष्प

परमार्थातून कौटुंबिक सौख्याची प्राप्ती योगेश्वरी महाराज : श्रीरामवाडी कीर्तन महोत्सवाचे सहावे पुष्प

136

आशाताई बच्छाव

1001040823.jpg

परमार्थातून कौटुंबिक सौख्याची प्राप्ती
योगेश्वरी महाराज : श्रीरामवाडी कीर्तन महोत्सवाचे सहावे पुष्प

सोनई/नेवासा कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी, कुटुंबात परमार्थाचा
स्पर्श नसल्यास कुटुंबवत्सल व त्यांच्या भावी पिढीत दशा निर्माण होऊन बहुतेक कार्याची दिशा बदलत जाते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सत्संगाची कास धरली, तर कौटुंबिक सौख्य होऊन पारमार्थिक महाधनाची प्राप्ती होते, असे विचार कौठा (ता. नेवासे) येथील योगेश्वरी महाराज दरंदले यांनी व्यक्त केले.
श्रीरामवाडी येथे आयोजित पारायण सप्ताह व कीर्तन महोत्सव कार्यक्रमात सहावे पुष्प गुंफताना बोलत होत्या. सोहळ्याचे मार्गदर्शक रायभान महाराज बेल्हेकर, गोविंद महाराज निमसे, राम महाराज कोल्हे, पांडुरंग महाराज जाधव, सागर महाराज राऊत, परमेश्वर महाराज इगारे, मोहन महाराज तोगे उपस्थित होते.
योगेश्वरी महाराजांनी संत नामदेव महाराज यांच्या “देह राहो अथवा जावो” या अभंगावर निरुपण केले. आध्यात्मिक कार्य म्हणजे प्रदर्शन नसल्याचे सांगत संत ज्ञानेश्वर महाराजांची
सोनई येथील कीर्तन महोत्सवात सहावे पुष्प गुंफताना योगेश्वरी महाराज दरंदले.
ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील प्रत्येक ओवी अमृततुल्य असल्याने त्यात रममाण होऊन गेलो, तरच ज्ञानाची अविट गोडी प्राप्त होत असल्याचे सांगितले. जीवनात परमार्थाचा पाझर मुरणे कधीच वाया जात नाही, असेही त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी सोहळ्याची रूपरेषा सांगून आभार मानले.

Previous articleपत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुका कार्यकारिणीची जाहीर.
Next articleलोकनेता संजय भाऊ राठोड यांना मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन द्यावे – एस राठोड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.