Home मुंबई कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा...

कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

93
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
प्रतिनिधी= किरण अहिरराव /युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Maharashtra SSC and HSC exam) पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे.

अशात काय करायचे याबाबत शिक्षणंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी झी २४ तासला माहिती दिली आहे.

दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय?

1. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार

२.विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.

३. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

४. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.

Previous articleताहाराबाद येथे जोरदार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नदिवरील पुल पुर्ण जलमय
Next articleगजा मारणे’ स्टाइल’ पडली महागात…! जामिनावर सुटलेल्या गुंडांचा धुमाकूळ, पाच जणांना अटक 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here