मुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82% इतकी मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल जाहूर या बुथवर 221 पदवीधरमतदार होते त्यापैकी 130 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 126 पुरुषांचा व 4 महिलां मतदाराचा समावेश होता. मतदान केंद्रावर covid-19 या साथरोग व शासनाचे सर्व नियम पाळूनसोशल डिस्टंसिंग ठेवून मतदान पार पडले यात आरोग्य खात्याच्या वतीने सॅनिटायझरने हात धुऊन व मशिनच्या साह्याने चेकअप करून मतदान केंद्रात प्रवेश करण्यात आला मतदान बुधवर मुखेड पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान सुरळीत व शांत स्थितीत पार पडले.
Home Breaking News मुखेड तालुक्यातील जाहूर बुथवर पदवीधर मतदान शांततेत पार मतदानाची टक्केवारी 58 .82%...