Home रायगड रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आचल दलाल नव्या पोलिस अधीक्षक

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आचल दलाल नव्या पोलिस अधीक्षक

337

आशाताई बच्छाव

1001526992.jpg

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आचल दलाल नव्या पोलिस अधीक्षक
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यभरात पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलिस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश आज (गुरुवार) जारी केले आहेत.

रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांचे नाव विद्यमान पद बदलीने पदस्थापना

१) राकेश ओला – पोलिस अधीक्षक, अहमदनगर पोलिस उप आयुक्त, बृहनमुंबई

२) सोमनाथ घार्गे – पोलिस अधीक्षक, रायगड पोलिस अधीक्षक, अहमदनगर

३) आंचल दलाल – समादेशक, रा. रा. पो. बल गट क्र. 1, पुणे पोलिस अधीक्षक, रायगड

४) महेंद्र पंडित – पोलिस अधीक्षक, कोल्हापूर पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर

५) योगेश कुमार गुप्ता पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड – पोलिस अधीक्षक, कोल्हापूर

६) बच्चन सिंह – पोलिस अधीक्षक, अकोला समादेशक, रा. रा. पो. बल गट क्र. 4, नागपूर

७) अर्चित चांडक – पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर पोलिस अधीक्षक, अकोला

८) मंगेश साठे पोलिस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, बृहन्मुंबई पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर

९) राजतिलक रोशन सहायक पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) मुंबई पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई

१०) बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक, पालघर पोलिस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)

११) यतीश देशमुख अपर पोलिस अधीक्षक, अभियान गडचिरोली पोलिस अधीक्षक, पालघर

१२) सौरभ अग्रवाल पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

१३) मोहन डहाके – पोलिस उप आयुक्त, ठाणे शहर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग

१४) विश्व पानसरे पोलिस अधीक्षक, बुलढाणा समादेशक, रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती

१५) धनलेश तांबे – पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण, नागपूर पोलिस अधीक्षक, बुलढाणा

१६) समीर अस्लम शेख पोलिस अधीक्षक, सातारा पोलिस उप आयुक्त, बृहनमुंबई

१७) तुषार दोषी – पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे पोलिस अधीक्षक, सातारा

१८) सोमय दिनायक मुंडे पोलिस अधीक्षक, लातूर पोलिस उप आयुक्त, परिमंडळ 1, छत्रपती संभाजीनगर

१९) जयंत मीना पोलिस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे पोलिस अधीक्षक, लातूर

२०) नितीन बगाटे – पोलिस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

२१) रितू खोकर – अपर पोलिस अधीक्षक, सांगली पोलिस अधीक्षक, धाराशिव

रितु खोकर यांची पोलिस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत.