Home बुलढाणा पुष्पांना आता ‘चंदन’ नव्हे ‘खैर’ पाहिजे ! – देऊळघाट वनपरिक्षेत्रात खैर वृक्षांवर...

पुष्पांना आता ‘चंदन’ नव्हे ‘खैर’ पाहिजे ! – देऊळघाट वनपरिक्षेत्रात खैर वृक्षांवर बेकादेशीर कुऱ्हाड ! किती झाडे होती, किती राहिली? याची माहिती वन विभागाकडे नाही!

134

आशाताई बच्छाव

1001526569.jpg

पुष्पांना आता ‘चंदन’ नव्हे ‘खैर’ पाहिजे ! – देऊळघाट वनपरिक्षेत्रात खैर वृक्षांवर बेकादेशीर कुऱ्हाड ! किती झाडे होती, किती राहिली? याची माहिती वन विभागाकडे नाही!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळघाट जिल्ह्यात चंदन झाडांची तस्करी तर झालीच आता देऊळघाट वनपरी क्षेत्रात अवैधपणे खैर या वृक्षाची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याचे आरोप होत आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी माहिती मागितली असता त्यांना टोलवा टोलवी करण्यात आली. बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत असलेल्या देऊळघाट येथील वनपरिक्षेत्रातील खैर या वृक्षांच्या झाडाची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे. याबाबत माहिती या भागातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली असता त्यांनी माहिती देता येत नसल्याचे पत्र संबंधित कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे संशय बळावला
आहे. हा प्रकार वनविभागाच्या तोंडाला काळे फासण्याचा असल्याचे आरोप R.T.I कार्यकर्ते सय्यद इरफान यांनी केला आहे.

त्यांनी दिलेल्या माहिती अधिकार अंतर्गतच्या अर्जात नमूद केले आहे की, मौजे देऊळघाट शिवारातील “खैर” जातीच्या वनवृक्षांना तोडण्याच्या पासेस ज्या लोकांना दिला त्यांची नावे द्या तसेच त्यांना किती झाडे तोडण्याची परवाना पास दिली? या माहितीसह “खैर” या वन वृक्षांची किती झाडे उभी आहेत? व झाडे तोडण्या वेळी किती झाडे होती? याबाबत माहिती मागितली मात्र त्यांना यापूर्वी त्रयस्थ व्यक्तीकांनी सदर माहिती मागितली असल्याने सदर माहिती देता येत नाही असे पत्र देऊन दिशाभूल करण्याच्या प्रयत्न केला आहे. तरी या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबतच्या सूचना कराव्यात त्याचप्रमाणे माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेवर बेजबाबदारपणे वागल्या प्रकरणी त्यांचेवर शासन नियमाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

Previous articleEXCLUSIVE – चिखलीत मोठा घोटाळा ! बनावट आदेशावर मिळवले जमिनीचे हक्क ? नागवाणी बंधूंना जेलची हवा ?
Next articleशॉर्टसर्किट मुळे दाबका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.