Home धाराशिव शॉर्टसर्किट मुळे दाबका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान

शॉर्टसर्किट मुळे दाबका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान

551

आशाताई बच्छाव

1001526616.jpg

शॉर्टसर्किट मुळे दाबका ग्रामपंचायतचे मोठ्या प्रमाणात नुकसान उमरगा प्रतिनिधी: तालुक्यातील दाबका गावातील ग्रामपंचायत मध्ये काल दि .२०/०५/२०२५ रोजी रात्री १०:३० वा ग्राम पंचायत कार्यालय दाबका येथे वायरच्या शाॅटसर्किट मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी माहिती ग्रामविकास अधिकारी श्री बिंदगे यांनी उमरगा पोलिस स्टेशन ला दिली.यामध्ये १)R.O.chiller,२)T.C.l मशिन ३)ऑफिस टेबल ४) रिव्हाॅलव्हिंग चीअर ५)R.O.मशिन-१,मोटर-१ ६)वाॅटर पंप -१. ७)वॉटर टॅंक ८)H.P.all in one Computer -१.८) प्लास्टिक खुर्ची ९)कुलिंग टॅंक १०)ग्रामपंचायत दप्तर ११) कपाट १२)अहुजा साऊंड सिस्टिम१३) एलईडी स्ट्रीट लाईट अशा प्रकारे साहित्य जळून खाक झाले आहे.याची माहिती उमरगा पोलिस स्टेशन ला ग्राम विकास अधिकारी श्री बिंदगे यांनी दिली. दाबका ग्राम पंचायत ला एकच खोली असल्याने सर्व कामे तेथून केली जातात.संरपंच, ग्रामसेवक, कम्प्युटर ऑपरेटर केबीन, ग्राम पंचायत दफ्तर,फिल्टरचे पाण्याचे सर्व मशिनरी, ग्राम पंचायतीशी निगडित सर्व साहित्य या एकाच खोलीतुन कामकाज गेली अनेक वर्षांपासून चालू आहे. झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांना देण्यात आले.पंचनामा पोलिस बीट अंमलदार श्री.कावळे यांनी केले.यावेळी अ.भा.छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, सर्जेराव पाटील, मोहसीन पटेल,ग्राम पंचायत शिपाई विकास चौधरी, रोजगार सेवक सुनील पवार आदी गावातील ग्रामस्थ घटनास्थळी होते.