राजेंद्र पाटील राऊत
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे माहाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश भाऊ चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे भव्य मेळावा
मुखेड तालुका प्रतिनिधी
मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीशभाऊ चव्हाण यांच्या प्राचारार्थ आज नांदेड येथील ओम गार्डन येथे
प्राचारार्थ पदवीधर व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी आ. सतीशभाऊ चव्हाण यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , माजी केंद्रीय राज्य मंत्री जयसिंग गायकवाड, खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर ,आमदार शामसुंदर शिंदे , माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण , माजी आमदार सुभाष साबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम, माजी आमदार अनुसया खेडकर आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांची उपस्थिती होती.