Home बुलढाणा चालतं-फिरतं हत्यार घेऊन धावताहेत बसेस

चालतं-फिरतं हत्यार घेऊन धावताहेत बसेस

111

आशाताई बच्छाव

1001530672.jpg

चालतं-फिरतं हत्यार घेऊन धावताहेत बसेस
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा, ‘प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ हे ब्रीदवाक्य असलेले एसटी महामंडळात अनेक भंगार बसेस अद्यापही राज्यातील विविध रस्त्यावर धावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बसेसचे पत्रे बाहेर निघून एक प्रकारे हत्यारासारखे घेऊन फिरत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता प्रवाशांसाठी जिवन वाहिनी नव्हे, तर जीवघेण्या हत्यारा सारख्या बनल्या आहेत. राज्यातील एका डेपोची बस रोडवर अक्षरशः मृत्यूचा खेळ खेळताना दिसली. या बसचा समोरील उजव्या बाजूचा पत्रा एक-दीड फूट बाहेर निघाला असून, तो रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येकासाठी टांगती तलवार बनलाय. कधी खिडकी तुटते, कधी छप्पर कोसळतं, आणि आता तर बसचं पत्राच हत्यार बनलंय. या आधी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा गावात असाच प्रकार घडला होता, जिथे अशा निष्काळजीपणामुळे सकाळी पोलिस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या आणि शेतात जात असणाऱ्या दोन तरुणांना आपले हात गमवावे लागले. आता राज्यातील काही रस्त्यांवर पुन्हा हाच ‘प्रताप’ दिसतोय.महामंडळाच्या
आंधळ्या व्यवस्थापनाला या चालत्या-फिरत्या हत्यारासारख्या बसेस दिसत नाहीत का? की प्रवाशांचे जीव धोक्यात टाकणं हाच आता महामंडळाचा नवा नियम आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिवहन मंत्री प्रताप ● सरनाईक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा नुसता अपघाताचा धोका नाही तर चालता फिरता मृत्यूचा सापळा आहे. काही दिवसा आधी आमच्या मलकापूर पिंपळगाव देवी रोडवर अशाच निघालेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांना आपला हात गमवावा लागला. आम्ही आंदोलन केले. मात्र नोकरीची मागणी मान्य करूनही नोकरी दिली नाही.
शुभम घोंगटे,

युवासेना जिल्हा उपप्रमुख
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या भयावह परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा नुसता अपघाताचा धोका नाही, तर महामंडळाच्या बेपर्वाईचं जिवंत उदाहरण आहे. नवीन बसेस ताफ्यात येत आहेत मात्र त्यांची संख्या अपुरी आहे. भंगार बसेस एक प्रकारे नागरिकांच्या व प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत.

Previous articleसाक्रीच्या टिटाणे गावात जलजीवनच्या कामात अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याचा संशय
Next articleप्रेम संबधाची खोटी बदनामी केल्याने मूलीची आत्महत्या -आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघां विरुद्ध गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.