Home बुलढाणा प्रेम संबधाची खोटी बदनामी केल्याने मूलीची आत्महत्या -आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघां विरुद्ध...

प्रेम संबधाची खोटी बदनामी केल्याने मूलीची आत्महत्या -आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघां विरुद्ध गुन्हा दाखल

117

आशाताई बच्छाव

1001530697.jpg

प्रेम संबधाची खोटी बदनामी केल्याने मूलीची आत्महत्या -आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघां विरुद्ध गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा मुलीचे प्रेम संबंध आहेत अशी समाजात खोटी बदनामी करून तिला जीवाने मारण्याची धमकी दिली. तिचा छळ सुद्धा केल्याने पिडीतेने या जाचा ला कंटाळून विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघां विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिस ठाणे अर्तगत उघडकीस आली.

पोलीस पोलिसांच्या माहितीनुसार, बेबीबाई राजू सोळंके रा. दाताडा ता.मलकापूर जि. बुलढाणा ह.मु. तालखेड ता. मोताळा यांनी आरोपी नातेवाईक विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमीला हिरामण पवार सर्व रा. परडा फाटा ता. मोताळा यांच्या विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी त्यांचा मुलगा विश्वजित याचे सोबत पिडीत मुलगी लता राजू सोळंके (वय 21) हीचे प्रेमसंबध असल्याची समाजात खोटी बदनामी केली. व तिला जिवाने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने आरोपींच्या जाचाला कंटाळून विषारी द्रव्य राशन करून आत्महत्या केली. या आरोपींनी पिडीतेस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असे पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार, प्रमीला हिरामण पवार सर्व रा. परडा फाटा ता. मोताळा यांच्या विरुद्ध कलम 108,351 (2) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleचालतं-फिरतं हत्यार घेऊन धावताहेत बसेस
Next articleवादळी वाऱ्याचा कहर ! हॉटेलची भिंत कोसळली, सहा मजूर जखमी; एकाची प्रकृती गंभीर; दगडवाडी फाट्यावर घटनेची धावपळ; देऊळगावराजा येथील घटना…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.