Home Breaking News महालक्ष्मी मंदिर उद्या पासुन दर्शनासाठी राहणार खुले

महालक्ष्मी मंदिर उद्या पासुन दर्शनासाठी राहणार खुले

262

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उद्यापासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र कोरोना संबंधीचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार राज्यातील सर्वच प्रमुख मंदिर संस्थानांनी आपली नियमावली तयार केली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरही उद्यापासून सुरू होत आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग , सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ३०४२ मंदिर उद्या खुली होणार आहेत. उद्यापासून भाविकांना सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ७ या वेळेत दर्शन घेता येणार आहे.

भाविकांना दर्शनाची नियमावली
१.दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार
२. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार
३.मंदिराच्या आतील आवारातील दुकान बंद राहणार
४.भाविकांना कासव चौक-पितळी उंबऱ्या पासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागणार
५. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही
६. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर चा वापर करूनच प्रवेश मिळणार
७.मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही
८.मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार
९ / १० वर्षा खालील लहान मुलं आणि जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही
१०.आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार .

Previous article*साप्ताहिक युवा मराठा* *वृतपत्रांच्या वार्षिक वर्गणीदार* *मोहिमेचा शुभारंभ*
Next articleदि ग्रेट मराठा चषक स्पर्धेत कुडाळकर 11संघ विजेता
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.