Home जळगाव रयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराला सुरुवात…!

रयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराला सुरुवात…!

28
0

आशाताई बच्छाव

1001557281.jpg

रयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराला सुरुवात…!                                         चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 

शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याची जडणघडण ही शिबिरातूनच घडत असते. शेतकरी चळवळीला एक समृद्ध वैचारिक परंपरा आहे आणि आजचा कार्यकर्ता केवळ भावनेवर नाही तर विचारांवर आधारलेला असावा, म्हणुन एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल, इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली येथे रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराला रयत क्रांती संघटनेचे राज्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. संघटनेला पूरक असे विविध विषय घेऊन प्रा. सुहास पाटील सर, प्रा. गणेश लोळगे, प्रा. जालिंदर पाटील सर, श्रीमती सोनल भोसकर, दि.बा. पाटील सर, श्री.अमर हबीब काका, श्री. थोरात सर, सागर खोत हे मान्यवर या दोन दिवसीय शिबिराला संबोधित करणार आहेत.

Previous articleकामाचे ठिकाणी लैंगिक अत्याचार गंभीर स्वरूपाचा गुन्हा – अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी
Next articleआमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here