Home जळगाव वादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी 

वादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी 

268

आशाताई बच्छाव

1001594213.jpg

वादळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली पाहणी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील 
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, टेकवाडे, रहिपुरी, वडगाव लांबे परिसरात वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत आज मी स्वतः प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य समजतो. नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही यावेळी शेतकऱ्यांना दिली.

– आमदार मंगेश रमेश चव्हाण