आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्यूरो चीफ श्री प्रशांत नागणे जे बी सराफ यांच्या शेतात झाली २५०० रोपांची बांबू लागवड उरुजेळी कांचन येथील प्रसिध्द उद्योगपती पंचकृषीतील प्रसिद्ध सोनार जे बी सराफ यांनी खूप मोठा निर्णय घेऊन तो अमलात आणला ते स्वता एक मोठे व्यावसायिक जरी असले तरी समाजाबद्दल ची आणि पर्यावरण विषयी ची आवड या ठिकाणी दिसून आली ज्यावेळी त्याना बांबू बद्दल माहिती समजली आणि बांबू मुळे पर्यावरणाला होणारे फायदे त्याना समजले तेव्हा त्यांनी थोडाही वेळ न लावता बांबू लावण्याचा खूप मोठा निर्णय घेऊन समाजामध्ये ते स्वता किती निसर्गप्रेमी आहेत याचा संदेश त्याना स्वतः दिला आज तापमान प्रचंड वाढत चालले आहे कार्बन चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे येणाऱ्या काळात हीच परिस्थिती अशीच चालत राहिली तर पूर्ण मानवजात यामधून वाचणार नाही आणि या समस्येला टाळायचे असेल तर याला येकच पर्याय आहे तो म्हणजे झाडे लावणे हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण वाढवणे आणि कार्बन डायॉक्साइड चे प्रमाण कमी करणे परंतु आज कोणताच शेतकरी झाडे लावण्याकडे वळत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी बैम्बू लागवड ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे कारण या लागवडीमुळे शेतकऱ्यांना पैसे तर मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या कमी होणार आहे कारण तज्ञाच्या मते एक बैम्बू चे रोप पूर्ण वर्षभरात ३२०kg ऑक्सीजन देते जे की एका माणसाला जगायला पूर्ण वर्षामध्ये २८०kg ऑक्सिजन ची गरज असते आणि बैम्बू हे पीक जास्त कार्बन खेचून घेते आणि हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन सोडते त्यामुळे बैम्बू च्या लागवडीमुळे पर्यावरण तर वाचणारच आहे पण शेतकऱ्यांना एक शाश्वत इनकम पण मिळणार आहे आणि याची सुरुवात करून जे बी सराफ यांनी एक वेगळाच संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि याचे कौतुक वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांकडून होत आहे आपण समाजात राहून आपले समाजासाठी काही तरी देणे लागतय आणि आपल्यामुळे पर्यावरण वाचले पाहिजे यासाठी झटणारी ही फैमिली यांचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे जे बी सराफ एम्पायरचे ओनर बोलताना म्हणाले की या प्रोजेक्ट चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावी आणि जास्तीत जास्त बैम्बू लागवड आपल्या भागात वाढेल यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा आणि त्यांनी निसर्गाचा आणि स्वतःचा फायदा याद्वारे करावा असा मोलाचा संदेश त्यांनी समाजाला दिला त्यांच्या शेतात बैम्बू लागवड होत असताना अग्रिहिता ग्रुप चे सीईओ रणजित गुळवे सीएमओ प्रशांत नागणे फाउंडर ज्ञानेश्वर पवार[डीएसपी]आणि कंपनी टीम उपस्थित होती बांबू लागवड संपर्क 9011116444