आशाताई बच्छाव
घर बांधकाम करणाऱ्या गवंड्याची मुलगी कुमारी जानवी चवळे या मुलीने गांधी विद्यालय पहेला येथून दहावीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला
पत्रकार संजीव भांबोरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या
संजीव भांबोरे
भंडारा –तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथील रहिवासी कुमारी जानवी अनेश्वर चवळे या मुलीने 88.60% टक्के गुण मिळवून गांधी विद्यालय पहेला येथून प्रथम येण्याचा मान मिळविला .मुलीचे वडील घर बांधकाम मिस्त्री असून परिस्थिती नाजूक असून अशाही परिस्थितीत मुलीने ,जिद्द ,मेहनत चिकाटी मनात ध्येय बाळगून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला.आज दिनांक 14 मे 2025 ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक संजीव भांबोरे यांनी त्यांच्या घरी निमगाव गावी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला असता दहावी नंतर आपण काय करणार? तर दहावी व अकरावी मध्ये आपण सायन्स मध्ये प्रवेश घेणार असून बारावीनंतर बीएससी ऍग्रीकल्चर करण्याच्या त्यांच्या मानस असल्याचे यावेळी त्यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले .यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे ,मुलीचे वडील अनेश्वर चवळे व आई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.