Home भंडारा पिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती

पिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती

88

आशाताई बच्छाव

1001501196.jpg

पिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती

संजीव भांबोरे
भंडारा –डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पिपरी च्या वतीने “अत्त दीप भव” चा जगाला महान संदेश देणारे विश्वशांती दूत महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंती समारोहाचे अध्यक्ष राजेश वाल्मिके, प्रमुख अतिथी लिलाधर चवरे, बाळकृष्ण भुरे, अरुण चन्ने, रेकचंद चवरे, गौतम चवरे, प्रतिमा रामटेके, सुमन रामटेके यांच्या हस्ते महाकारुणिक तथागत बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीराम यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदनेने बुद्ध जयंती ची सुरुवात करण्यात आली. बुद्ध आणि त्यांचा धम्म व त्यांच्या ऐतिहासिक जीवन कार्यावर व तत्त्वज्ञानावर समीक्षा चवरे यांनी प्रास्ताविकेतून प्रकाश टाकला. तर नाशिक चवरे यांनी बुद्ध पौर्णिमेचे ऐतिहासिक महत्त्व सांगून संपूर्ण जगाला युद्धाची नाही तर बुद्धांच्या विचाराची गरज असल्याचे सांगितले. राजेश वाल्मीके यांनीही बुद्धांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक चवरे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार समीक्षा चवरे यांनी केले. जयंती कार्यक्रमात बहुसंख्य बौद्ध उपासक, उपासिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नितीन मेश्राम, कुंदा चवरे, मालू खोब्रागडे, भारती चवरे, वैशाली चवरे, आर्थिक चवरे, विक्की चवरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Previous articleराधादेवी बाकलीवाल शाळेची 100 टक्के निकालची परंपरा कायम
Next articleदहावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.