आशाताई बच्छाव
भोकरदन शहर व तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यास जोरदार पावसाला सुरुवात
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
गेल्या दोन तीन दिवसापासून भोकरदन तालुका व भोकरदन शहरांमध्ये दुपारच्या सत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असून आज सुद्धा विजा व मेघ गर्जनेसह पाऊस पडत आहे या सुरू असलेल्या पावसाचे क्षणिक चित्र आमचे प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी टिपले आहे ते या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत भोकरदन शहर व आजू बाजूच्या परिसरामध्ये दोन-तीन दिवसापासून अक्षरशा पावसाने जोरदार सुरुवात केली असून नागरिकांची नागरिकांची व शेतकऱ्यांची धावपळ पहावयास मिळत आहे शेतातील चालू असलेल्या पावसापूर्वी मशागतीची कामे ठप्प झाली आहे लगातार दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडत असून आज एक वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे आज सुरू असलेल्या पावसाने बरेचसे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे छोट्या मोठ्या नाल्यांना पाणी वाहत असून रहदारीचा रस्ता पूर्णतः पाण्या खाली गेला आहे पूर्व मशागतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यां ची धांदल उडाली असून मुकी जनावरे या पावसाने झोडपली गेली आहे वातावरणानुसार व हवामानाच्या अंदाजानुसार बारा मे ते 20 मे पर्यंत सोसाट्याचा वारा व पावसाच्या अंदाज हवामान खात्याने वर्तव्यला आहे तो कुठेतरी खरा ठरताना दिसत आहे (थोड्याच वेळात बघा व्हिडिओ न्यूज फक्त युवा मराठा न्यूज टि.व्ही.वर)