Home बुलढाणा ट्रक-दुचाकी अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर

ट्रक-दुचाकी अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर

57
0

आशाताई बच्छाव

1001480901.jpg

ट्रक-दुचाकी अपघातात भाचा ठार तर मामा गंभीर
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा एकीकडे प्रचंड
उन्हाचा प्रकोप सुरु असून त्यामध्ये या आठवड्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईची धूम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ होत आहे. अशाच धामधुमीच्या काळात विटांनी भरलेल्या ट्रकची व मोटार सायकलची जोरदार धडक होवून मोटारसायकल वरील एकाच्या मेंदूचा चेंदामेंदा होवुन त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा नात्याने मामा असलेला ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा-मलकापूर रोडवरील तालखेड फाट्याजवळ ५ मे रोजी दुपारी ११ वाजेदरम्यान घडली. हा अपघात एवढा भयानक होता की, यामधील लग्नठरलेल्या युवकाचा मेंदू बाहेर पडून त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर असे की, वडगाव ता. मोताळा येथील सुरेश मुरलीधर लोखंडे वय ४५ वर्षे व नात्याने त्यांचा भाचा असलेला अजय संजय कावने वय २९ रा. दाताळा हे दोघे जण डिलक्स मोटारसायकल क्र. एम. एच. १९ टी एस ००४१ या दुचाकीवर मलकापूरकडे जात होते. दरम्यान समोरुन विटांनी भरलेला ट्रक क्र. एम. एच. १६ ए वाय ०९३० दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल वरील अजय संजय कावने रा. दाताळा याचा मेंदूचा अक्षरशः चुराडा होवून त्याचा जागीच मृत्यू झाला तर नात्याने मृतकाचा मामा असलेले सुरेश मुरलीधर लोखंडे रा. वडगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय फॅव्रचर झाले आहेत.
त्यांच्यावर बुलडाणा येथे
खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. मृतक याचा नुकताच विवाह लोखंडे परिवारातच पक्का झालेला असल्याची माहिती घटनास्थळावर दोन्हीच्या नातेवाईकांनी दिली असून घटनास्थळावर दोन्हीच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. यावेळी बोराखेडी पोस्टेचे एपीआय शेंगेपल्लु, एएसआय शरद खर्चे, एनपीएल प्रवीण पडोळ यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामा केला. ट्रक बोराखेडी पोस्टेला जमा केलेला असून वृत्तलिहेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.

Previous articleEXCLUSIVE – नखगळतीचे ओरखडे कायम ! – केसगळती नंतर नखगळतीचे 75 रुग्ण बाधीत ! आयसीएमआर चा अहवाल लालफीतशाहीत अडकला
Next articleसावखेड तेजन येथील शेतकऱ्याच्या जनावरांवर वीज कोसळून मृत्य
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here