Home बुलढाणा दरोडा! मध्यरात्री 15 म्हशींचा कल्लोळ ! – चाकू दाखवून पाळीव जानवरांची लूट...

दरोडा! मध्यरात्री 15 म्हशींचा कल्लोळ ! – चाकू दाखवून पाळीव जानवरांची लूट ! – पोलीस चोरांना वेसन लावणार का?

109

आशाताई बच्छाव

1001545912.jpg

दरोडा! मध्यरात्री 15 म्हशींचा कल्लोळ ! – चाकू दाखवून पाळीव जानवरांची लूट ! – पोलीस चोरांना वेसन लावणार का?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर जिल्ह्यात पाळीव जनावरांची तस्करी वाढत असल्याचे उदाहरण मलकापूर- बुलढाणा रस्त्यावर मध्यरात्री दिसून आले. चाकूच्या टोकावर तब्बल 15 म्हशींची लूट करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री समोर आली आहे.प्राप्तमाहितीनुसार, खंडव्याकडून सिल्लोड कडे जाणारे वाहन मलकापूर- बुलढाणा रस्त्यावर दाताळा टोल नाका परिसरात थांबवून 5 ते 6 अज्ञात व्यक्तींनी चालकाला चाकू दाखवून लुटमार केली. जवळपास 4 ते 5 लाख रुपये किंमतीच्या 15 म्हशी लुटमारीत लंपास करण्यात आल्या. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 24 मे च्या पहाटे अडीच वाजता हा प्रकार घडला. शेख अबीद शेख हबीब रा. खंडवा हे एमपी 12 झेड डी 1295 क्रमांकाच्या वाहनातून 16 म्हशी हरसी वाळूद (सिल्लोड) येथे घेऊन जात होते. वाहक शेख ऐजाज आणि मालक शेख नईम सोबत होते. दरम्यान दाताळा टोल नाक्यावर कार मधून उतरलेल्या 6 जणांनी तिघांना मारहाण करत अज्ञात शेतात सोडले. सकाळी 6.30 वाजता वाहन पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडण्यात आले परंतु वाहनात 16 पैकी 15 म्हशी चोरी गेल्याचे यावेळी निदर्शनास आले. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे 14 म्हशी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.