आशाताई बच्छाव
चांधई ते धोडप रस्त्याचा कंत्राटदाराला पडला विसर, वर्ष होऊनही रस्त्याचे काम अर्धवट नागरिक त्रस्त…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली तालुक्यातील धोडप ते चांधई या रस्त्याचे काम गेल्या दीड वर्षा अगोदर कामाला सुरुवात करण्यात आली. चांधई ते धोडप रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले परंतु धोडप येथे गाववस्ती असल्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करण्यासाठी काही दिवस विलंब लागला व तो रस्ता ५०० ते ६०० फुट रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आला. गाव वस्तीच्या समोरील रस्ता ४००ते ५०० फुट हा नुसता खडीकरण करून डांबरीकरण न करता कंत्राटदाराने सोडून देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने अक्षरशा हाहाकार केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील मुरूम वाहून गेला व रस्त्यारवती मोठमोठाले खड्डे पडले आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे या रस्त्यावरती धोडप येथील शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना या रस्त्याने दररोज आपल्या शेतीच्या कामासाठी जावे लागते.
धोडप गावालगत पडलेल्या खड्ड्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता धोडप ते चिखली ला जोडणारा असून पंचक्रोशीतील धोडप, पळसखेड सपकाळ, करवंड, शेलसुर, डोंगर शेवली, डोंगर खंडाळा, वरवंड येथील नागरिक या रस्त्याचा पर्याय निवडतात परंतु या रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कंत्राटदाराकडून अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून घ्यावे असे स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.






