आशाताई बच्छाव
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जालना येथे मॅरेथॉन व वॉकाथॉन उत्साहात
अहिल्याबाईंचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे” – रावसाहेब पाटील दानवे
“नागरिकांचा प्रतिसाद पाहता असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना, दि. ३१ मे (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, जालना महानगरतर्फे आज सकाळी भव्य मॅरेथॉन व वॉकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमध्ये महिलांसह पुरुष, युवक-युवती व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली असून, अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जालना ग्रा.जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी बोलताना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श स्त्री प्रशासक नव्हत्या, तर त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि स्त्री सबलीकरणाचे मूर्त उदाहरण निर्माण केले,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.






