आशाताई बच्छाव
स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान यांची स्वतंत्र कोकण राज्याची मागणी
मुंबई:-(प्रतिनिधी विजय पवार)
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक/ अध्यक्ष:- श्री.संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मुंबईत मराठी पत्रकार परिषद घेण्यात आली. कोकण राज्य वेगळे व्हावे. त्यासेच त्याचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जिल्ह्यासह कोकणचा नकाशा बनवून स्वातंत्र राज्याची मागणी करण्यात आली.
आमच्या कोकणावर आणि कोकणी माणसांवर नेहमीच अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान, मुंबई गोवा हायवे अजून पूर्ण झाला नाही. असे अनेक प्रश्नांचा भडीमार पत्रकार परिषदेत करण्यात आला. तसेच कोणाचीही सरकार आले तरी कोकणावर दुर्लक्ष करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला संजय कोकरे, धनंजय कुवेस्कर , अॕड.संदीप विचारे,राजेंद्र खानविलकर, मुरलीधर करंगुटकर, दिलीप लाड, राजेंद्र सुर्वे प्रथमेश कदम,अंकुश जोस्टे ,प्रदीप मयेकर, आणि पदाधिकारी उपस्थित होते.






