आशाताई बच्छाव
सावखेड तेजन येथील शेतकऱ्याच्या जनावरांवर वीज कोसळून मृत्य
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-सिंदखेडराजा सावखेड तेजन येथे वीज कोसळून शेतकरी बाजीराव आंधळे यांचे जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज कोसळल्यामुळे त्यांचा एक बैल, एक गाभण गाय आणि एक गोहा जागीच मृत्युमुखी पडले.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे आणि नायब तहसीलदार डॉ. प्रविण वराडे यांच्या सहमहसूल अधिकारी विष्णू थोरात, सावखेड तेजनचे सरपंच संजय अचलखांब, महसूल सेवक राजू खरात, आकाश माघाडे, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.






