आशाताई बच्छाव
वाघळी येेथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील वाघळी येथील चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या भरणार्या रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभाग व चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत 9 गॅस सिलेंडरसह गॅस भरणारे मशिन असा सुमारे 36 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार 22 रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास अवैध गॅस रिफिलिंग करणार्या दुकानावर पुरवठा निरीक्षक ज्योत्सना हनुवते, हवालदार गोवर्धन बोरसे, ओंकार सुतार, पोकॉ. प्रदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीसांनी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे 9 घरगुती गॅस व गॅस भरणारे मशिन असा ऐवज जप्त केला असून फकिर शहा याचे विरूद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.