Home जळगाव विद्यार्थांनी जाणून घेतली सायबर क्राईम बद्दल माहिती

विद्यार्थांनी जाणून घेतली सायबर क्राईम बद्दल माहिती

99

आशाताई बच्छाव

1001441742.jpg

विद्यार्थांनी जाणून घेतली सायबर क्राईम बद्दल माहिती

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव येथे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मार्फत कायदेविषयक शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते. मंचावर मुख्याध्यापक रमेश सोनवणे, शिक्षक राजेंद्र वराडे, देवेंद्र दाभाडे, श्रीमती.रेणुका पाटील, पोलीस हवालदार पंढरीनाथ पवार, पो कॉ श्री.पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर यांनी केले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी म्हणाले की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, इंटरनेट आदी माध्यमांचा वापर करतांना घ्यावयाची काळजी तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली वैयक्तिक माहिती, ओटीपी कोड शेअर करू नये. व योग्यवेळी नाही बोलायला शिका याबाबत माहिती दिली. तसेच पोलीस रेझिंग डे निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन श्रीमती.सुनिता ठोके यांनी केले, आभार श्रीमती.पुनम पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.