आशाताई बच्छाव
वाशिम (गोपाल तिवारी)
वाशिम जिल्ह्यातील तसेच मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावातील नागरिक कायमस्वरूपी दारूबंदी करिता उपोषणाला बसणार…
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंगळा गावातील ग्रामस्थ दारू विक्रीमुळे त्रस्त झालेले आहेत. वेळोवेळी मागणी करूनही फक्त थातूरमातूर कारवाई कारवाई केल्या जाते. 30 एप्रिल पर्यंत शंभर टक्के दारूबंदी करण्यात यावी व मुंगळा बीट मधील कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी आज निवेदनातून दिली आहे. मालेगाव पोलीस ठाण्याचे फौजदार संजय चौधरी यांना निवेदन देताना संत गाडगेबाबा व्यसनमुक्ती विचार मंचचे कार्यकर्ते व संयोजक अनंता दौलत कुटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मालेगाव पोलीस यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे मुंगळा वासी यांचे लक्ष लागले आहे.






