Home बुलढाणा किन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण ! – तिघांविरुद्ध -गुन्हा दाखल !

किन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण ! – तिघांविरुद्ध -गुन्हा दाखल !

98

आशाताई बच्छाव

1001444943.jpg

किन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण ! – तिघांविरुद्ध -गुन्हा दाखल !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत किन्होळा येथे एकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना 23 एप्रिल
रोजी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निलेश पंजाबराव धंदर रा. कोलवड, यश रवींद्र जाधव रा. कोलवड, गणेश सदाशिव पंडित रा. बुलढाणा अशी या आरोपींची नावे आहेत.
फियार्दी सतीश व्यंकटराव बाहेकर (51) रा. किन्होळा हे 21 एप्रिल रोजी ब्रह्मपुरी तालुका चिखली येथे कार्यक्रमात गेले होते. तिथे साडेसात वाजता निलेश पंजाबराव धंदर रा. कोलवड हे भेटले असता दोघात काही बोलचाल झाली. यावेळी सतीश व्यंकटराव बाहेकर हे गावी निघून गेले.22 एप्रिल रोजी सतीश व्यंकटराव बाहेकर बुलढाणा येथे लग्न कार्यक्रमात आली असताना, अण्णा अनिल दामोदर म्हस्के यांचा फोन आला होता. त्यांनी आमच्या माणसाला त्रास का देता म्हणून जाब विचारला होता. दरम्यान रात्री अकरा वाजता च्या सुमारास किन्होळा येथे घरी येऊन तिघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वीट मारून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दिल्याने तीघां आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleमुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !
Next articleमोबाईलच्या हट्टापायी गमावला जीव ! रागाच्या भरात उचलले मूलाने टोकाचे पाऊल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.