Home जळगाव वाघळी येेथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई

वाघळी येेथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई

124

आशाताई बच्छाव

1001441791.jpg

वाघळी येेथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील वाघळी येथील चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या भरणार्‍या रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभाग व चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत 9 गॅस सिलेंडरसह गॅस भरणारे मशिन असा सुमारे 36 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार 22 रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास अवैध गॅस रिफिलिंग करणार्‍या दुकानावर पुरवठा निरीक्षक ज्योत्सना हनुवते, हवालदार गोवर्धन बोरसे, ओंकार सुतार, पोकॉ. प्रदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीसांनी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे 9 घरगुती गॅस व गॅस भरणारे मशिन असा ऐवज जप्त केला असून फकिर शहा याचे विरूद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleछताला गळफास घेऊन भवाळी येथे तरूणाची आत्महत्या
Next articleपहलगाम दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.