आशाताई बच्छाव
आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन…
( पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रहाटणी ,पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्र. २८ मध्ये रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले. या विकासकामामुळे स्थानिक रहदारीला गती येऊन नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ आणि सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.
आपले पिंपरी चिंचवड शहर आता विकासाच्या दिशेने भक्कम पावले टाकत आहे. तसेच, स्थानिक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरून आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी मा. नगरसेवक श्री. नाना काटे, श्री. शत्रुघ्न काटे, श्री. चंद्रकांत नखाते, श्री. बाबासाहेब त्रिभुवन, श्री. कैलास थोपटे, मा. नगरसेविका सौ. निर्मलाताई कुटे, सौ. सविताताई खुळे, मंडल अध्यक्ष श्री. सोमनाथ तापकीर, श्री. हर्षद नढे, मा. स्वीकृत नगरसेवक श्री. विनोद तापकीर, श्री. संदीप नखाते, श्री. संदीप गाडे श्री. गोपाळ माळेकर, भाजयुमो शहराध्यक्ष श्री. राज तापकीर, सामाजिक कार्यकर्ते श्री. देविदास तांबे, श्री. नरेश खुळे, श्री. गणेश नखाते, श्री. संकेत कुटे, श्री. पांडुरंग तांबे, श्री. नाना कुंजीर, श्री. सुनील कुंजीर, श्री. यशवंत नखाते, श्री. माऊली खाणेकर, माजी ग्रामविकास अधिकारी श्री. भाऊसाहेब पोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.






