Home बुलढाणा बिबट्याने 12 बकऱ्यांचा पाडला फडशा; दीड लाखाचे नुकसान

बिबट्याने 12 बकऱ्यांचा पाडला फडशा; दीड लाखाचे नुकसान

111

आशाताई बच्छाव

1001444907.jpg

बिबट्याने 12 बकऱ्यांचा पाडला फडशा; दीड लाखाचे नुकसान
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मोताळा तालुक्यातील गुळभेली शिवारातील घटना
बुलडाणा :- मोताळा मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीतील गुळभेली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्या ठार झाल्याची घटना सोमवार 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तालुक्यातील गुळभेली शिवारात गट म. 8
मध्ये आत्माराम पंढरी दळवी यांची शेता टीनशेडचा गोठा बांधलेला आहे. 20 एप्रिलच्या रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यामध्ये आपल्या बकऱ्या बांधून घरी गेले होते. दरम्यान 21 एप्रिलच्या सकाळी बिबट्याने टीनशेडच्या गोठ्यात जाळीतून गोठ्यात प्रवेश करीत अचानक हल्ला चढवित 7 बकऱ्या, 3 बोकड, 2 पिल्ले असे एकूण 12 जनावरांचा फडशा पाडला, तर 1 बोकडाचे पिल्लू जखमी केल्याने दळवी यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
मोताळा वनविभागाचे वनपाल एस.एच. जगताप व वनरक्षक आर.बी.शिरसाट पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिक कोकाटे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Previous articleजेवळी बसवरत्न पुरस्कार 2025 चे मानांकन जाहीर
Next articleमुलाचा राग अनावर झाला; त्याने वडिलाचा मुर्दाच पाडला !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.