आशाताई बच्छाव
पहेलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे जाहीर निषेध
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- दिनांक 22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चाळीसगाव च्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर प्रकारे करण्यात आला आहे.
पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले हा अत्यंत नीच प्रकार असून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे या अतिरेक्यांना केंद्र सरकारने शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार होणार नाही अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.