आशाताई बच्छाव
गावठी कट्टा विक्री करणारे दोघे संशयित आरोपी जेरबंद अहिल्या नगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरात गावठी कट्टा विक्री करणारे दोघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस असा ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. राजेंद्र बाळु ससाणे वय २७, अमोल साहेबराव ढावरे वय २८, दोन्ही रा.नायगाव, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर, असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथून अहिल्यानगर शहरातील तारकपूर परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार रोहित मिसाळ, मनोज लातुरकर, किशोर शिरसाठ, रमीजराजा आत्तार व अरूण मोरे यांच्या पथकाने केली.