आशाताई बच्छाव
चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
पाईपलाईन रस्त्यावर चैन स्नॅचिंग करणाऱ्या संशयित आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पाईपलाईन रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिराजवळ महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारा संशयित आरोपी नगर शहरातील उपनगर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस दुचाकीसह ताब्यात घेतले. तसेच चोरी केलेले दागिने असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, सुनिल शिरसाठ, सुनिल चव्हाण, योगेश चव्हाण, वसिम पठाण, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतिष भवर, महेश पाखरे यांच्या पथकाने केली.






